। पनवेल । वार्ताहर ।
आजच्या मातृदिनाचे औचित्य साधून येथील श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेलने त्यांच्या अभिनव उपक्रमाला हातभार लावण्याच्या सजग हेतूने वीस लाखांची भरघोस मदत केली आहे. क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या सहकार्यांनी श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे विश्वस्त नितीन मुनोथ यांच्यासह अन्य विश्वस्त मंडळींना धनादेश सुपूर्द केला.
यावेळी समाजसेवक राजू सोनी, सतीश पावशे, श्याम जहागीरदार, संजीवनी मालवणकर, संतोष आंबवणे, यतीश सादराणि, संगीता कामाठी, आदींचे सह रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सदस्य तथा श्री. पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे विश्वस्त तथा कार्यकर्ते, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही येथे उभारलेले काम हे एका प्रामाणिक हेतूने उभारलेले आहे. येथून आम्हाला कुठल्याही स्वरूपाचे अर्थार्जन होत नाही. पशु सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानून ज्यांना ज्यांना आम्हाला मदत करायची आहे ते आम्हाला आर्थिक सहाय्य करू शकतात. आपले वाढदिवस लग्नाचे वाढदिवस स्मृती दिवस अन्य दिवस लक्षात ठेवण्यासाठी आपण येथे येऊन आपले कार्यक्रम करू शकता तसेच आम्हाला सहकार्य देखील करू शकता. रोटरी क्लब प्रमाणे अन्य सेवाभावी संस्थांनी देखील पुढे येऊन आम्हाला सहकार्य करावेअशी मी विनंती करतो.
नितीन मुनोथ, विश्वस्त, श्री. पांजरपोळ गोरक्षण संस्था, पनवेल