| पनवेल | वार्ताहर |
थेट विणकर ते ग्राहक विक्री अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे महिला वर्गासाठी पनवेलमध्ये प्रथमच खास येवला येथील कापसे पैठणीचे भव्य प्रदर्शन व विक्रीसाठी आयोजन करण्यात आले आहे.
दि.27, 28, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत गणपती मंदिर हॉल मिडल क्लास हौसिंग सोसायटी मैदानाजवळ या भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते महेंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, डॉ.गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष रो.शैलेश पोटे, रो.सचिव दिपा गडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी 500 रुपयांपासून ते 50 हजारापर्यंत पैठणी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच येवला प्युअर पैठणी, ब्रोकेड पैठणी, सेमी पैठणी, कांजीवरम सिल्क, चंदेरी, प्युअर सिल्क, इरकली, माहेश्वरी, पैठणी ड्रेस मटेरियल, पैठणी दुपट्टा, पर्स, उपाडा व इतर अनेक साड्या येथे विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. तरी या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शैलेश पोटे यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी 9322111115/9820044742 व 9820956554 येथे संपर्क साधावा.