उरण प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल किंग विजेता

चिरायू डॉमीनेटर्स  उपविजेता

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील जेएनपीए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या उरण प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत  रॉयल किंग संघाने  अजिंक्यपद पटकाविले. तर  चिरायू डॉमीनेटर्स  उपविजेता ठरला. या स्पर्धेत  अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून नयन बंडा, मालिकावीर  प्रशांत कडू, उत्कृष्ट गोलंदाज  योगेश सरदेसाई, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रफुल ठाकूर, सर्वाधिक षटकार आणि उत्कृष्ट फलंदाज  म्हणून  प्रथमेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली.
   
या स्पर्धेला सुधीर घरत, धनाजी  ठाकूर, मंगेश चौगले, सुनील ठाकूर,  प्रशोब पनिककर, दीपेनभाई,  नंदू पाटील, किरीट पाटील, मनोज भगत,  बी.एन.डाकी, विनोद म्हात्रे, जितू  नाईंक,दत्ता ठाकूर, प्रकाश ठाकूर, सदानंद ठाकूर आदींनी भेट दिली. सूत्रसंचालन  नितेश पंडित यांनी केले. बक्षिस वितरण  शरद ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण लेदर क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी अजित म्हात्रे, मंदार लवेकर, अमित पाटील, शरद म्हात्रे, विकास घरत, संदीप पाटील, दिनेश बंडा,  निलेश ठाकूर, अमित ठाकूर, तुषार हतंगले, रोहन पाटील उरण पंच कमिटी  माळी सर व सहकारी, जेएनपीटी पीच मेन्टेनर पाटील यांचे  मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version