| नवी दिल्ली | वृत्तंस्सथा |
अनेक बँका आणि व्यक्तींकडून 80 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेल्या एका व्यक्तीस दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी हा दिल्लीतील ग्रीन पार्कमधील रहिवासी असून विनय विशाल शर्मा असे त्याचे नाव आहे. विनय अॅफिनिटी सलूनचा मालक असून त्याने अनेक बँका आणि व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. अनुराग चंद्रा यांनी तक्रार दाखल केली होती की, विनय विशाल शर्माने 2016 मध्ये त्यांच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. विशालने अनुरागला त्याच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. विनयने सुशांत लोक फेज-1 येथील निवासी मालमत्तेचा ताबा आणि तीन आउटलेट्समधील फायदेशीर व्याजही सुरक्षितेसाठी म्हणून जमा केले होते.