। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील जय हनुमान क्रीडा मंडळ तळवली यांच्या वतीने व कोलाड कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने संपन्न झालेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत पाले खु.संघाने सर्वोत्कृष्ट खेळ करून स्पर्धेतील अंतिम विजेतेपद पटाकावून चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील उपविजेतेपद चिल्हे संघाने पटाकावले. तर तृतीय क्र.व चतुर्थ क्र.अनुक्रमे नडवली व डोलवहाल या संघांनी पटाकावले. तर मालिकावीर म्हणून रोहित माने, उत्कृष्ट चढाई सनी कोठेकर,उत्कृष्ट पक्कड रोहित घोगले यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जय हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी रघुनाथ कोस्तेकर, गजानन बामणे,दत्तात्रेय मरवडे,रामचंद्र बामणे,नामदेव मरवडे, वसंत मरवडे, बबन कोलाटकर, खेळू मरवडे, एकनाथ मरवडे, रवी मरवडे, मारूती बामणे, दयाराम मरवडे, सुभाष बामणे,अजित चितळकर, संतोष चितळकर,नंदू मरवडे,रविंद्र मरवडे, भिमेश बामणे, दिनेश घोगळे, अरविंद भिलारे, नरेंद्र मरवडे, विकास कोस्तेकर, हरिश्चंद्र मांगुळकर, रामकृष्ण नागावकर, किसन बामणे, अनंता मरवडे, सुरेश वाघमारे आदींसह मोठ्या संख्येने कबड्डीप्रेमी नागरिक उपस्थित होते.