पोयनाड रिक्षा चालक मालक संघटतर्फे आरटीओचा निषेध

पंधरा दिवसात मागण्या मान्य करा
जिल्हााध्यक्ष विजय भाऊ पाटील यांची मागणी
भाकरवड | वार्ताहर |
पोयनाड येथील विक्रम मिनि डोअर, मॅजिक इको चालक मालक संघटना यांनी आरटीओकडील विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी काळे झेंडे घेऊन जाहीर निषेध नोंदवला. येत्या 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे.
गेल्या वीस पंचवीस वर्षे हे रिक्षा चालक मालक सहा आसनी गाड्या चालवत आहेत दिवसेंदिवस पेट्रोल ,डिझेल चे दर वाढत चालले असून महागाई सुद्धा वाढतच चालली आहे. ग्रामीण ,दुर्गम भागातील प्रवाशांना हे मिनिडोअर तसेच रिक्षा चालक योग्य आकारणी घेऊन आपली गाडी चालवत आहेत मात्र प्रवास आता महाग झाले आहे पंधरा वर्षे झालेल्या मिनिडोअर रिक्षा यांचे आरटीओ स्क्रॅप करीत आहे त्यातूनच नवीन गाडी खरेदीसाठी आवक नसल्याने जिल्ह्यातील चालक मालक संघटना संकटात सापडत आहे तर त्या गाड्यांचे मेंटेनन्स ही महाग असून त्याचे पार्ट उपलब्ध होत नाही. रायगड जिल्ह्यातील बहुतांश चालक हा सुशिक्षित बेरोजगार तरुण असून प्रवासी सेवा उपलब्ध करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आहे.
कोरोनाच्या महामारीत मृत पावलेल्या चालक मालकांच्या वारसांच्या नावे गाडी परवाना कोर्टात न होता आर टी ओ मार्फत व्हावा तर पी टी त्याक्स चक्री व्याज पद्धतीने वसूल न करता साध्या पद्धतीने घ्यावा तर सरकारने कोरोनाच्या काळात तीन आसनी रिक्षासाठी महिन्याला 1500 रुपये जाहीर केले होते परंतु संघटनेचे परमिट धारक अशा प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी परिपत्रकाद्वारे म्हटले आहे.यावेळी युनियन उपाध्यक्ष घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ पन्नासहून अधिक सदस्यांनी सहभाग घेतला होता प्रत्येकाने आपल्या हातात काळे झेंडा दाखवत निषेध दर्शवला.

Exit mobile version