पहिल्या दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग | प्रतिनिधी |
वडखळ येथे शुक्रवार, दि. 18 नोव्हेंबरपासून हुंदाई ग्रामीण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास पहिल्याच दिवशी जवळपास 300 लोकांनी या महोत्सवास भेट देऊन हुंदाई मोटर्सकडून दिल्या जाणार्या विविध योजनांबद्दल माहिती घेतली.
या महोत्सवाचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे रायगड जिल्ह्याचे रीजनल मॅनेजर धर्मेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना हुंदाई मोटर इंडियाचे एरीया मॅनेजर दिग्विजय पाटील म्हणाले की, ग्रामीण भाग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे आणि येणार्या काळात आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये अधिक वृद्धी झालेली दिसेल आणि म्हणूनच गो रुरल या संकल्पनेखाली अधिक अधिक ग्रामीण भागातील कस्टमरपर्यंत पोहोचण्याचा हुंदाई इंडियाचा प्रयत्न राहील.
या कार्यक्रमात शरयू हुंदाईकडून एसयुव्ही झोन, सीएनजी झोन, स्पेअर पार्ट्स, क्सेसरीज, एक्सचेंज तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वाहन कर्ज यासाठी स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. यावेळी महिला वर्गासाठी मेहंदी कार्यक्रम, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच सर्व ग्राहकांसाठी वेगवेगळ्या मनोरंजन स्पर्धांचे आयोजन केले होते
याप्रसंगी शरयू हुंदईचे सीओओ शिवप्रसाद शेट्टी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि मुस्तफा सय्यद यांनी आभार प्रदर्शन करून पुढील दोन दिवस या महोत्सवास भेट देण्याचे सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे.