। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अण्वस्त्र सज्ज करण्याचे आदेश दिल्याने या दोन देशांमधला तणाव आणखी वाढला आहे.
दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पोलिश राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. आक्रमणाचा सामना करण्यासाठी पुढील संयुक्त पावले उचलण्यावर या दोघांनीही सहमती दर्शविली आहे.
काही वेळातच ठरणार युद्धाचे भवितव्य; रशिया-युक्रेन करणार चर्चा
