| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुक आयोगाने मतदारांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यासाठी मोठी निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरचे बुधवारी निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन म्हणून नाव देण्यात येणार आहे. तेंडुलकर आणि निवडणूक पॅनल यांच्यात बुधवारी दिल्लीत सामंजस्य करार होणार आहे. तीन वर्षांच्या करारांतर्गत तेंडुलकर मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोग जोरात काम करत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी निवडणुकांमध्ये, विशेषतः सार्वत्रिक निवडणुका (लोकसभा) 2024 मध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी युवकांमधील तेंडुलकरच्या अद्वितीय प्रभावाचा फायदा घेण्याच्या दिशेने हे सहकार्य एक महत्त्वाचे पाऊल असेल.असे नमूद केलेले आहे.