उरण पोलिसांच्या वतीने सुरक्षा जनजागृती उपक्रम

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कायदा, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती याबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी उरण पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश खांदवे, बीट मार्शल व गोपनीय शाखेच्या अमलदारांनी उरण परिसरातील चार शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुन्हेगारी, सायबर फसवणूक आणि वाहतूक नियमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षकांना गुड टच-बॅड टच, मोबाईलचा योग्य वापर आणि मित्रांसोबत वागताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, अनोळखी व्यक्तींपासून सावध कसे राहावे आणि पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती देण्यात आली. बीट मार्शल आणि गोपनीय शाखेच्या अमलदारांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना विविध गुन्ह्यांपासून दूर कसे राहावे, याचे प्रात्यक्षिकही दाखवले. एकूण या चारही शाळेतील 373 विद्यार्थी व 16 शिक्षक या अवेअरनेस उपक्रमात सहभागी झाले होते. शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी उरण पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून यापुढेही असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Exit mobile version