प्रासोल कंपनीत सुरक्षा सप्ताह

| खोपोली | प्रतिनिधी |

साजगाव आडोशी औद्योगिक क्षेत्रातील प्रासोल कंपनीत सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सुरक्षा संबंधित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सुरक्षा सप्ताहाला सोमवारी (दि.4) करण्यात आली. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजारोहण करून व सामूहिक सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन विविध सुरक्षा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. यावेळी वरिष्ठ तांत्रिक व्यवस्थापक सचिन प्रभू, ईएचएस विभागाचे व्यवस्थापक अनिल पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version