| रसायनी | वार्ताहर |
राष्ट्रीय रास्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा व अशोक भाऊ मुंढे फौंउडेशन व टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एका रॅलीचे आयोजन बालाजी ऑटोबाईल्स ते भटवाडी गाव असे करण्यात आले होते. या रॅलीत रस्ता सुरक्षाविषयक पोस्टर्स छळकत होते. यावळी वाहनचालकांना व परिसरातील नागरिकांना वाहन चालविताना आपली सुरक्षा कशी घ्यावी यावर माहिती देण्यात आली. या रॅलीची सांगता अशोक मुंढे यांच्या फार्म हाऊस येथे करण्यात आली.
दरम्यान, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आरटीओ कळंबोली अधिकारीदेखील उपस्थित होते. या रॅलीत माजी सरपंच अशोक मुंढे, माजी पोलीस अधिकारी गोरे, क्लबचे माजी अध्यक्ष रोटरीयन सुनील भोसले व रसायनी पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले.