साई भजन मंडळ ठरले मानकरी

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था रजि. आयोजित नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर लाईन संलग्न श्री. छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी, श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजित भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि.17) सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाशी रेल्वे स्टेशनजवळील साई हेरिटेज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत 26 रेल्वे प्रवासी भजन मंडळे सहभागी झाली होती. त्यात साई भजन मंडळ डोंबिवली या मंडळाला दशरथ भगत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विनय विचारे, सचीन बेलकर, राकेश गायकवाड, किरण चव्हाण, प्रवीण मेढेकर, विजय वर्दम, उमेश घरवे, श्रीकांत रामाने, दीपक कांबळे, सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

Exit mobile version