साई पालखी सोहळा संपन्न

| उरण । वार्ताहर ।
श्री साईबाबा संस्थान शिरगावच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ गणपती ते शिरगाव एकदिवसीय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार सकाळी 10.00 वाजता पादुकांचा अभिषेक करण्यात आला. पालखीमध्ये उमरगा, मुळज, बोरी, बार्शी, करमाळा, राशीन, सराठी, पंढरपूर आदी ठिकाणांहून मोठया प्रमाणात साई भक्त पालखीत सहभागी झाले. पालखी यशस्वी नियोजनासाठी मंदिराचे विश्‍वस्त रवी जाधव, विभावरी जाधव, डिंपल लालचंदानी, राकेश मुगळे, संजय पवळे, अनिल कंधारे, देवेंद्र हलगुडे, लीला मोडक, धनाजी जाधव, भरती इंदुलकर, कविता पवळे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version