राज्यस्तरीय स्केटिंगमध्ये सईला सुवर्णपदक

| माणगाव | सलीम शेख |
स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनमार्फत दि. 16 ऑक्टोबर रोजी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सई सुदर्शन इप्ते हिने 300 व 500 मीटरमध्ये 12 वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकाविले आहे. या कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेची विद्यार्थिनी असून, सई ही पेण तर्फे तळे या गावची रहिवासी आहे. स्केटिंगच्या विविध प्रकारच्या स्पर्धांतून तिने यशस्वी सहभाग घेतला आहे. तिच्या या यशाचे सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version