। उरण । प्रतिनिधी ।
शेलघर येथील कार्यालयात तीन कंपन्यांतील कामगारांच्या पगारवाढीचे करार करण्यात आले. यात मे. सुरज ऍग्रो इन्फ्रा. प्रा.ली. जेएनपीटी उरण या कंपनीतील कामगारांसाठी तीन वर्षासाठी 16 हजार रुपये पगारवाढ करण्यात आली. त्याचबरोबर एक बेसिक पगार कामगारांच्या परिवारासाठी मेडिक्लेम पॉलीसीसाठी तसेच 14% बोनस देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तर, तळोजा येथील सवेरा इंडिया रायडींग सिस्टीम या कंपनीतील कामगारांसाठी 9 हजार 200 रुपयंची पगारवाढ, 3 लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलीसी, एक ग्रॉस पगार बोनस व 10 लाख रुपयांची टर्म इन्शुरन्स देण्याचे मान्य करण्यात आले. तिसरा करारनामा मे. किम केमिकल्स या कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीसाठी करण्यात आला. या करारनाम्यानुसार काममारांना तीन वर्षासाठी 6 हजार 500 रुपये पगारवाढ तसेच एक ग्रॉस सॅलरी आणि प्रत्येकी 5 हजार बोनस देण्याचे मान्य करण्यात आले.
यावेळी न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी.के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील उपस्थित होते. तर, सुरज ऍग्रो कंपनीतर्फे जयेश चौहान, सुशील कुराळे तसेच कामगार प्रतिनिधी अरुण पाटील, राकेश म्हात्रे, सौकत अली, किशोर पाटील आदि उपस्थित होते. सवेरा इंडिया तळोजा या कंपनीतर्फे अजय पवार तर कामगार प्रतिनिधी संदीप म्हात्रे, रविंद्र जंगम, भरत बोडका, सुभाष तांडेल, हरी पाटील, आत्माराम पाटील, रोशन भोईर, विनोद बारसे, महेंद्र म्हात्रे, रामलाल पासवान आदि उपस्थित होते. किम केमिकल्स तळोजा कंपनीतर्फे महेश चंदानी व कामगारांतर्फे सुनील पाटील, विश्वास भोईर, श्रीनाथ मढवी, सुभाष म्हात्रे आदी उपस्थित होते.