साळाव पूल अवजड वाहतुकीस बंद

जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश जारी फक्त पाच टन वाहतुकीस मुभा

| रेवदंडा | प्रतिनिधी |
अति अवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच रेवदंडा-साळाव पुलाचे दुरूस्तीचे काम सुरू करावयाचे असल्याने पुढील दोन महिन्यांकरीता रेवदंडा-साळाव पुलावरून पाच टनावरील वाहतूक बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केला आहे.

अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी अति अवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच रेवदंडा-साळाव पुलाचे दुरूस्तीचे काम सुरू करावयाचे असल्याने पुढील दोन महिन्यांकरिता रेवदंडा-साळाव पुलावरून पाच टनावरील वाहतूक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रान्वये अलिबाग ते साळावदरम्यान होणारी अवजड वाहनांची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड-वडखळ-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी-चेकपोस्ट-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोळी-रोहा-तळेखार-साळाव मार्गे व मुरूड, अलिबागदरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरूड-साळाव-तळेखार-चणेरा-कोलाड-नागोठणे-वडखळ-पोयनाड-अलिबाग अथवा मुरूड-साळाव-तळेखार-रोहा-कोलाड-नागोठणे पेझारी चेकपोस्ट-अलिबाग तसेच दुसरा मार्ग मुरूड-साळाव-तळेखार-रोहा-सुडकोळी-वावे-बेलकडे-अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात, असे कळविले आहे.याबाबत सर्व वाहन चालक, ग्रामस्थ व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाचे वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version