सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

शाळेत अवतरल्या सावित्रीच्या लेकी

| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा मराठी शाळेत बुधवार (दि. 3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आल्या. शाळेतील मुलींनी सावित्रीच्या वेषभूशेत जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, अरुण माळी, श्री. पावरा, दिलीप शिंदे, इंदिरा चौधरी यांनी सावित्री बाईंच्या जीवनावर माहिती सांगून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू शिर्के उपस्थित होते.

श्रमिक विद्यालयात सावित्रीबाईंना अभिवादन

| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दिपक जगताप यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्ररसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तर विद्यार्थी वर्गाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची केलेली वेशभूषा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

तटकरे तंत्रनिकेतनात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

| कोलाड | वार्ताहर |
कोलाड गोवे येथील श्रीमती गीता. द. तटकरे तंत्रनिकेत, व आय टी आयमध्ये बुधवार दि.3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य विपुल मसाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्री बाईच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य विपुल मसाल, अजित तेलंगे, संजय हजारे, बिनीता चौधरी, प्रियंका जामकर, रुपेश पवार, नेहा नागोठकर आदी सह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version