। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील तरुण समीर अशोक डुकरे याने कृषी अर्थशास्त्राची पदवी मिळविताना आयबीएस परीक्षेत देशात 95वा क्रमांक मिळविला आहे. दरम्यान, या तरुणाची तात्काळ बँक ऑफ महाराष्ट्र या अर्थसंस्थेत ऍग्रीकल्चर फिल्ड मॅनेजर पदावर नियुक्ती झाली आहे.
समीर डुकरे या तरुणाने शेलू गावात प्राथमिक तर दहावी पर्यंतचे शिक्षण शेलू बांधिवली येथील माध्यमिक शाळेत आणि बारावीपर्यंत विज्ञान शाखेचे शिक्षण कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेत घेतले. त्यानंतर कृषी क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर बारावी विज्ञान शाखेतून दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी क्षेत्रातील पदवीचे शिक्षण घेतले. विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत 76 टक्के गुण मिळविणार्या समीर डुकरे यांनी नंतर कृषी अर्थ शास्त्रात पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. कृषी अर्थ शास्त्राची परीक्षा देश स्तरावर होत असते आणि त्या पदवीत्तर परीक्षेत 84 टक्के गुण मिळवून देशात 95वा क्रमांक मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यानंतर त्यांना कृषी शास्त्राची पदवी परीक्षेतील देशस्तरावरील यशाने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अग्रिकल्चर फिल्ड मॅनेजर पदावर संधी मिळाली आहे. त्याबद्दल कर्जत तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







