समीर पाटील यांची न्यायालयाकडून मुक्तता

। उरण । वार्ताहर ।
शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून दाखल झालेल्या खटल्यातून समीर पाटील, रा.चिर्ले यांची पनवेलचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.संतोष शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. अ‍ॅड. प्रमोद ठाकूर व अ‍ॅड किशोर पाटील यांनी जिल्हा सत्र न्यायालयात समीर पाटील यांच्यातर्फे युक्तीवाद केला. दास्तान फाटा ते दिघोडे येथील वेश्‍वी (दादरपाडा) बस थांब्याजवळील एमआयडीसीच्या पाईप लाईनला अज्ञात ट्रेलर वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेसंदर्भात चिर्ले गावातील रहिवासी समीर पाटील यांच्याविरोधात पाईप लाईनचे नुकसान तसेच शासकीय अधिकार्‍यांच्या कामात अडथळा निर्माण केला म्हणून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Exit mobile version