गुरुकुलमध्ये समावर्तन कार्यक्रम संपन्न

। रसायनी । वार्ताहर ।

नवी मुबंई येथील श्रीस्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत इयत्ता दहावीचा समावर्तन संस्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सद्गुरू देवप्रसाद दास स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपलं जीवन मूल्य आहे, संस्कार पाहिजेत. गुरुकुलचं नाव आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी वाढवलं आहे. पुढे ते म्हणाले, गुरुकुलचे विद्यार्थी आज देशाच्या बाहेर गेले आहेत, पण गुरुकुलचे संस्कार विसरले नाहीत. उत्तम जीवन जर हवं असेल तर संतांसोबत रहा म्हणजे आयुष्यात कधी वाईट मार्गावर जाणार नाही. असं बोलून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला.

कार्यक्रमात मुख्य उपस्थिती म्हणून साधू कृष्णचरणदास स्वामी, परमपूज्य विश्‍वमंगलदास स्वामी, ब्रम्हस्वरूप स्वामी, मुख्याध्यापक डॉ.पी. हरिबाबू रेड्डी आणि सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थीवर्ग, पालकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version