। तळा । प्रतिनिधी ।
गायमुख (पन्हेळी) बौद्धवाडी येथील सम्यक पूजा भिमराज जाधव (पन्हेळी, तळा) याची वयाच्या 20 व्या वर्षी भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पन्हेळी येथे झाले असून उच्च शिक्षण द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथे झाले. सम्यक कला शाखेची पदवी उत्तीर्ण असून तो मागील 3 वर्षांपासून कमांडो अकॅडमी सातारा येथे सैनिकी शिक्षण घेत होता. या कालावधीत त्यांनी मैदानी प्रशिक्षण घेत असतानाच लेखी परीक्षेचा देखील मनापासून अभ्यास केला. लहानपणापासून देश सेवा करण्याची ईच्छा असलेल्या सम्यकने आपल्या अथक मेहनतीने हे यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केले आहे.
सम्यक जाधवची भारतीय सैन्य दलात निवड

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606