| पुणे | प्रतिनिधी |
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्यानिमित्ताने सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी रविवारी (दि.21) सायंकाळी पुणे येथे 9 हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येत सनातन गौरव दिंडी काढली. यात वीसहून अधिक विविध संप्रदाय-संघटना सहभागी झाल्या होत्या. पुणे शहरात ठिकठिकाणी रांगोळी काढून व दिंडीवर पुष्पवृष्टी करून मान्यवरांच्या हस्ते दिंडीचा सन्मान करण्यात आला.
या दिंडीमध्ये सद़्गुरु स्वाती खाड्ये, गजानन बळवंत साठे, संगिता पाटील आणि मनीषा पाठक आदी संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. तसेच विद्याधर नारगोलकर, शेखर मुंदडा, सुरेखा गायकवाड, स्वप्नील नाईक, सुर्यकांत पाठक, चेतन राजहंस आणि सुनील घनवट हे उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरील विमलाबाई गरवारे प्रशाळेच्या मैदानात दिंडीची सांगता झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शेवटी चैतन्य तागडे यांनी दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.