संदीप पाटील यांची बैलगाडी ठरली विजेती

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे चौल, नागांव, रेवदंडा विभागीय चिटणीस सचिन राऊळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नागांव विभाग बैलगाडी, घोडागाडी मालक संघाच्यावतीने नागांवमधील साताड बंदर येथे बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन मंगळवारी (दि.02) करण्यात आले होते. या स्पर्धेत संदीप पाटील यांच्या बैलगाडीने विजय मिळविला. त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सचिन राऊळ पुरस्कृत बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचे उद्घाटन नागांवचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, संदेश नाईक, नागांव घोडागाडी, बैलगाडी संघटना कमिटीचे पदाधिकारी, सभासद, बैलगाडी हौशी, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत 25 गटांचा समावेश असून 23 बैलगाडी व दोन घोडागाडी गटांचा समावेश होता.

सायंकाळी अंतिम स्पर्धा पार पडली. यात संदीप पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळविला असून सदीकले बंधू यांच्या बैलगाडीने द्वीतीय आणि मनोहर ठाकूर यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळविला. बैलगाडीच्या मालकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version