सानियाचा टेनिसला अलविदा

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने आठवड्याभरापूर्वीच आपल्या निवृत्तीबाबतची योजना सांगितली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने दुबईत फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या WT-1000 स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सानियाने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक भावनिक पत्र लिहिले. त्या तिने यंदाची ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा ही कारकिर्दितील शेवटची स्पर्धा असणार आहे असे सांगितले. ऑस्ट्रेलिया ओपन ही 16 जानेवारी पासून सुरू होत आहे.

Exit mobile version