हुतात्मा चौक येथे स्वच्छता गृह सुरु

नेरळ विकास प्राधिकरण कडून बांधकाम

। नेरळ । वार्ताहर ।

नेरळ माथेरान नाक्यावर असलेल्या हुतात्मा चौक येथे नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वच्छता गृह बांधण्यात आले आहे. माथेरान या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी माथेरान नाका येथे हुतात्मा चौक असून तेथून माथेरान जाण्यासाठी प्रवासी आणि खासगी गाड्या जात असतात. त्या ठिकणी पर्यटनासाठी निघालेले पर्यटकांकडून तेथे स्वच्छतागृह बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. यानंतर हुतात्मा स्मारक समितीने नेरळ विकास प्राधिकरण आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादीर यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणाकडून स्वच्छता गृह बांधण्यासाठी निधी मंजूर केला होता.

बांधकाम पूर्ण झालेल्या या स्वच्छता गृहाचे लोकार्पण सरपंच उषा पारधी आणि मंगेश म्हसकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सदस्य राजनेंद्र लोभी तसेच राजू हजारे, प्रवीण पोलकमी आदी उपस्थित होते.

Exit mobile version