। मुंबई । प्रतिनिधी ।
खा. संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. आता त्यांच्या जामीन याचिकेवर 9 नोव्हेंबरला निकाल दिला जाणार आहे.
गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर 21 ऑक्टोबरला सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत 2 नोव्हेंबरला ठेवली. आता पुन्हा या जामीन याचिकेची सुनावणी 9 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. ईडीने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्या खात्यावर पुन्हा 55 लाख वळवले. याच कालावधीमध्ये इतरही व्यवहार झाल्याचं ईडीने म्हटलंय.
अलिबागमध्ये आठ प्लॉटच्या खदेरीत रोख व्यवहार
अलिबागमधील किहिम समुद्रकिनार्यावरील आठ प्लॉट हे वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने घेण्यात आलेले. स्वप्ना या संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणार्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. या व्यवहारामध्ये नोंदणीच्या रक्कमेसोबतच थेट रोख व्यवहारही झालेत. ही सर्व संपत्ती ईडीने अटॅच केली आहे.