संजय राऊत यांचा कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाकडून सत्कार

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचय तज्ज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दज अलिबागमधील चार्टड अकाऊंटट संजय राऊत यांचा कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या वतीने त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला.

कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे विश्‍वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी यांच्या हस्ते संजय राऊत यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष मधुकर परकर, कमलाकर पडवळ, संतोष मोरे, दत्तदास मोरे, तुकाराम शिलधनकर, राजेंद्र बांदिवडेकर, भारत रांजकर यांच्यासह संजय राऊत यांच्या कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी तोडणकर गुरुजी यांनी संजय राऊत यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सचोटीच्या स्वभावामुळे प्रामाणिकणामुळेच त्यांची ही निवड करण्यात आली असावी. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये संजय राऊत यांची निवड करण्यात आली आहे. स्वच्छ प्रतिमेमुळेच त्यांची नियुक्ती केली जात असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारत रांजणकर यांनी देखील संजय राऊत यांचे अभिनंदन करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Exit mobile version