प्रत्येक गटात एक फुटीर शिंदे असतो

संजय राऊत यांचे सूचक विधान; मुख्यमंत्र्यावर निशाणा
। मुंबई । प्रतिनिधी ।
कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचचं नाहीये. पण राज्यात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. जे नेते म्हणतात हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायमच असतो हे लक्षात घ्या, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

राऊत यांनी रविवारी अमोल कीर्तिकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचं भाकीत केलं. यावेळी बोलताना राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांच कौतुक केलं आहे.

अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबत आहे. ठिक आहे, गजाभाऊंनी एक निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयासोबत अमोल नाहीत. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Exit mobile version