| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामिनावरील सुनावणी 21 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला आहे. दरम्यान सत्र न्यायालयात लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली. खडसेंनी आस्थेवाईकपणे चौकशी केली असता मचिंता करु नका, सगळं ओके आहेफ असं राऊत म्हणाल्याचं खडसेंनी सांगितलं. यावेळी मंदाकिनी खडसेही सोबत होत्या.
संजय राऊत म्हणाले ओके है सब, काही चिंता करू नका म्हणे, आताच बाहेर येणार म्हणे मी असं खडसे म्हणाले. खोक्यासंदर्भात काही बोलले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, खोके नाही, ओके आहे बोलले अशी मिश्किल टिपण्णी खडसेंनी केली. राऊत साहेबांशी लिफ्टजवळ भेट झाली माझी, दोन मिनिटं ते बोलले, सब कुछ ओके है, तुम्ही काळजी करु नका असं बोलल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं.