। रसायनी । वार्ताहर ।
खालापूर तालुका कृषी विभागातर्फे तालुक्यात नविन तंत्रज्ञान शेतकरी वर्गापर्यंत पोहचविण्याचे तसेच त्यांचे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. जेणेकरून भाताचे उत्पन्न वाढले जाईल.त्याचबरोबर चारसुत्री हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.शेतीचा बांध हा पडीक न राहता खरीप हंगामात त्याच्यावर सुद्धा काहीतरी लागवड करता येईल या विचारांतून माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य प्रभाव आधारित खताचा संतुलित वापर 10% टक्के खतांची बचत कीड व रोग संरक्षण काढणी पश्चात तंत्रज्ञान व भात शेती कृषी विभाग योजना विषयी माहिती व प्रशिक्षण सभा आणि श्रेणी भेटी या द्वारे देण्यात आले. 1 जुलै रोजी खालापूर पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, प्रगती शेतकरी, कृषिमित्र, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे सदस्य सहभागी होणार आहेत.या सर्व बाबीचा शेतकर्यांना लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ ( नारनवर ) यांनी केले आहे,