संत गाडगेबाबा समाजभूषण पुरस्कार

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव मारुती पवार यांना रविवारी (दि.12) आविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते राज्यस्तरीय विशेष संत गाडगेबाबा समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

आविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात गेली 18 वर्षे कार्यरत आहे. या फाऊंडेशनतर्फे समाजात वेगवेळ्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. यावर्षी फाऊंडेशनतर्फे पन्हाळगड-कोल्हापूर याठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यात माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा सामाजिक क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांचा संस्थेतर्फे राज्यस्तरीय विशेष संत गाडगेबाबा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय पवार, राज्य पुरस्कार निवड समिती सदस्य माधुरी सावंत, फाउंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते आदी मान्यवरांसह राज्यभरातून पुरस्कारती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Exit mobile version