म्हसळ्यात संत सेवालाल जयंती उत्साहात

। म्हसळा । वार्ताहर ।

संत सेवालाल महाराजांचा जन्म कर्नाटक राज्यात गुत्तीबल्लारी या गावी 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. या जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. म्हसळा तहसील कार्यालय येथून बाजारपेठ मार्गे पाचगाव आगरी समाज सभागृहापर्यंत सेवालाल महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बंजारा समाजातील लहान थोरांसह मान्यवर समाज बांधवांनी सहभाग घेवून पारंपारिक वेशभूषात संपूर्ण शहरभर सेवालाल महाराजांचा जयघोष केला.

या निमित्ताने धेनु चव्हाण, शंकर चव्हाण, प्रवीण चव्हाण, देवेंद्र पवार, सीताराम राठोड, ज्योती महादेव पवार, विश्‍वनाथ पवार, राजू पवार, रमेश राठोड, भागुबाई चव्हाण, सीताबाई चव्हाण, कुलाबाई राठोड आदी समाज बांधव उपस्थित होते.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना धेनु चव्हाण यांनी सांगितले की, सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी संपूर्ण आयुष्यभर सर्वस्वाचा त्याग करुन समाजाला मान-सन्मान प्राप्त करुन दिला. त्यांचा हा त्याग समाजासमोर एक आदर्श असून प्रत्येकांनी त्यांच्या आदेशाच पालन करणे अत्यावश्यक आहे. सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी एकसंघ राहण्याचे आवाहन धेनु चव्हाण यांनी केले.

Exit mobile version