वक्तृत्व स्पर्धेत सानवी मांडळेकर प्रथम

| रेवदंडा | वार्ताहर |
साळाव जेएसडब्लू कंपनीच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांर्तगत वळके हायस्कूल येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आठवी इयत्तेतील सानवी मांडळेकर प्रथम, वेदिका खोत द्वितीय, इयत्ता नववीतील विकी भोईरने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेकरीता ‘आत्मनिर्भर भारत’ हा विषय देण्यात आला होता. या कार्यक्रमास जेएसडब्ल्यू कंपनीचे सीएसआर विभागाचे प्रमुख राम मोहिते, इलेक्ट्रीक विभाग प्रमुख रमण धुमाळ, को.ए.सो. माध्यमिक शाळा वळके मुख्याध्यापक आर.डी.नाईक, सीएसआर विभागाचे राकेश चवरकर, शिक्षक बालाजी लाटे, सुरेश मोरे, पूनम लाटे, मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या पूजा ठाकूर, वर्षा ठाकूर, शीतल गायकर यांची उपस्थिती होती.

Exit mobile version