वन महोत्सव काळात सामाजिक वनीकरण विभागाकडून सवलतीच्या दरात रोप

। नेरळ । वार्ताहर ।
रायगडमधील कर्जत सामाजिक वनीकरण विभागाने 15 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत सुरु असणार्‍या वनमहोत्सवात 8 ऑगष्टपर्यंत 67 व्यक्तींना 10765 रोपांची विक्री केली असून त्यामधील 1 लाख 20 हजार रुपये महसूल सामाजिक वनीकरण कर्जत विभागाने शासनाच्या तिजोरीत जमा आहे. तर,कर्जतमधील 41 ग्रामपंचायतींना 8300 रोप, खालापूरमधील 30 ग्रामपंचायतींना 6010 रोप आणि 14 प्रशासकीय विभागांना 6880 रोपांचे फ्री वाटप केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सवात कर्जत सामाजिक वनीकरण विभागाकडून लहान पिशवीतील रोप 10 रुपये तर, मोठ्या पिशवीतील रोप 40 रुपये प्रति रोपाची विक्री 30 सप्टेंबरपर्यंत सुरु आहे. त्यामध्ये करंज, चिंच, जांभुळ, आवळा, सिताफळ, काशिद, बांबु, साग, कदंब, पेल्ट्रोफार्म या जंगळी व फळ झाडांचा समावेश असून आडुळसा, निरगुडी, ब्राम्ही, इंशुलिंग, गुलवेळ, तुळस व काळीमिरी या वन औषधी वनस्पतींचा समावेश आहे.त्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार्‍या वनमहोत्सव काळात जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेचा लाभ नागरीकांनी घ्यावा असे आवाहन कर्जत सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस.पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version