। नेरळ । वार्ताहर ।
कृषि महोत्सवाचे निमिताने कर्जत तालुक्यातील साळोख येथील लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम शाळेकडून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने लिटिल स्टार शाळा परिसर तसेच कळंब-साळोख मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या दोनशे रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण कर्जत विभागाचे वनक्षेत्रपाल चव्हाण यांच्याकडून 200 रोप पुरवण्यात आली. यावेळी मसूद बुबेरे, सोमनाथ फराट, शरद शेटे, शिक्षक वर्ग तसेच मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.