सारळच्या तरुणांची नदीला परिक्रमा

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सारळ येथील तरूणाई गेली दोन वर्ष नित्य नियमाने स्थानिक नदीची परिक्रमा करत आहेत. अध्यात्म व सामाजिक गरज या दोन्हीचा समन्वय साधत चालू केलेली नदीची परिक्रमा यावर्षी पावसाळ्यात करत एक नवीन पर्यटनचा पायंडा सुरू केला आहे. समुद्रसंगम ते उगम आणि उगम ते समुद्रसंगम अशी सरला नदीची परिक्रमेचा हा रस्ता निसर्गाच्या सानिध्यात रमणारा आहे. दरवर्षी हा कार्यक्रम मे महिन्यात असतो. यंदा मात्र तो पावसाळ्यात केल्याने निसर्गाचे अनोखे दर्शन यावेळी परिक्रमावाशीयांना झाले. अशा प्रकारचा नदी परिक्रमेचा प्रयत्न किंवा प्रयोग रायगडमध्ये तरी सारळ येथील तरुणाईने पूर्ण करून दाखवला आहे.

सारळ येथील सरला नदीची ही तिसरी प्रदक्षिणा आहे. सद्यस्थितित चिखल, दंगडधोंडे, झाडेझुडपे, यातून हा मार्ग जात ही प्रदक्षिणा होते. काही ठिकाणी काठ योग्य नसतील तिथे नदीच्या बाजूने पाऊल वाटेने जावे लागते. यामुळे प्रदक्षिणेत येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी, याचाही नैसर्गिक अभ्यास होतो. सारळघोळ येथून उगम पावणारी ही नदी कनकेश्वरडोंगर, नदीच्या काठावर असणारी देव देवतांची विविध मंदिरे तसेच म्हात्रोळी, मळा, सारळ, या तीन गांववस्ती ठिकाणाला स्पर्श करून जोते. ही नदी सारळपूल इथे समुद्रात संगम होऊन विसर्जित होते. समुद्रसंगम ते उगम व उगम ते समुद्रसंगम असा प्रवास केल्यास ही प्रदक्षिणा पूर्ण होते. पाण्याची जागृतता व पर्यटन या नवीन उपक्रमाच्या अनुषंगाने चालू केलेल्या या नदी परिक्रमेबाबत सर्वच सदस्यांचे सर्व परिसरातून अभिनंदन केले जात आहे. तसेच, तिन्ही प्रदक्षिणेत मुख जीवन रक्षक म्हणून कार्य केलेले नीलेश राणे यांचे विशेष कौतुक परिसरातून होत आहे.

Exit mobile version