त्रिपुराने उडवला सौराष्ट्राचा धुव्वा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशांतर्गत क्रिकेटमधील 50 षटकांची सर्वात मोठी स्पर्धा विजय विजय हजारे करंडक स्पर्धेत अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या उपस्थितीत गतविजेत्या सौराष्ट्रला सोमवारी पराभव पत्करावा लागला. विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेतील अ गटातील सामन्यात त्रिपुराविरुद्ध 148 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना त्रिपुराने 50 षटकांत 8 गडी गमावून 258 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात सौराष्ट्रला 31.4 केवळ 110 धावा करता आल्या.

गणेश सतीश (74 चेंडूत 72 धावा), सुदीप चॅटर्जी (93 चेंडूत 61 धावा) आणि बिक्रम कुमार दास (76 चेंडूत 59 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्रिपुराने आठ गड्यांच्या मोबदल्यात 258 धावा केल्या होत्या. यानंतर जयदीप देवच्या (15 धावांत 5 बळी) शानदार गोलंदाजीमुळे सौराष्ट्रचा डाव 31.4 षटकांत केवळ 110 धावांवर आटोपला.

अनुभवी डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकटने सौराष्ट्रकडून 35 धावांत पाच गडी बाद केले. पण त्याचा संघाला काही फायदा झाला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रला सुरुवातीलाच वेगवान गोलंदाज मूरा सिंग आणि राणा सिंग यांनी दोन मोठे धक्के दिले. त्यामुळे हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन आणि चिराग जानी अवघ्या 13 धावांच्या धावसंख्येपर्यंत तंबूमध्ये परतले. पुजारा (24) आणि अर्पित वसावडा (16) यांनी चौथ्या गड्यासाठी 37 धावांची भागीदारी करून संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. विक्रम देबनाथने पुजारा पायचित करुन ही भागीदारी तोडली, त्यानंतर संघाचा डाव संपुष्टात आला.

Exit mobile version