शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

| ठाणे | वृत्तसंस्था |

भिंवडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिन्ही चिमुकले भिवंडी येथील वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेले होते. साहील शेख (13), गुलाम अन्सारी (14), आणि दिलबर अन्सारी (11) असे या तीन मृत मुलांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. याच सुट्टीचा फायदा घेत ही तिन्ही मुले घरातून बाहेर पडले होते. मात्र उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यानंतर घाबरून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेऊनही मुलांचा पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी शेवटी गुरुवारी (दि.21) शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार नोंदवली गेली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली. अग्निशामक दलानेही तलावात शोध मोहीम चालू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी गुलाम या मृतदेह सापडला. त्यानंतर रात्री साहीलचाही मृतदेह मिळाला. दिलबर या छोट्या मुलाचा मृत्यू रात्रभर सापडला नव्हता. शेवटी शोध घेतल्यानंतर आज (दि.22) दुपारी दिलबरचा मृतदेह सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version