| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
शालेय पोषण आहार नित्यनियमाने शिजवून देणार्या, अल्पसे असे मानधन असतानासुद्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेणार्या कष्टकरी महिलांचा सत्कार श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगावतर्फे करण्यात आला. यावेळी या कष्ठकरी महिलांना मुख्याध्यापक अर्चना खोत व पर्यवेक्षक प्रतीक पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी या शाळेचे शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील व शिक्षक सागर राऊत, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा मोरे व आभार प्रदर्शन संस्कृती मिठागरी यांनी केले.