| नेरळ | प्रतिनिधी |
रोटरी क्लब देवनार मुंबई आणि ग्रामीण रोटरी मंडळ यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणार्या आठ शाळांमधील 250 मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. तीन किलोमीटरपेक्षा लांबून चालत येणार्या विद्यार्थिनींसाठी या सायकली रोटरीकडून देण्यात आल्या.
यावेळी रोटरी क्लबचे गव्हर्नर तेजस देसाई, भावी अध्यक्ष दीपक जिरानंदानी तसेच, अमित व्होरा यांच्यासह देवनार रोटरीचे अध्यक्ष राजश्री मोकाशी, उपाध्यक्ष अलका मुरली, तसेच जेष्ठ पदाधिकारी राजेंद्र दाते, झंकार गडकरी, व्ही कन्नन, नलिनी कन्नन, सनी कपूर, अंजू फडके, शोभा, कमांडर जाना, अमित, शानबाग आदी उपस्थित होते.
हुमगावमधील मंदिरासमोर आयोजित कार्यक्रमात सहा जिल्हा परिषद तसेच, दोन माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या. त्यावेळी ग्रामीण रोटरी मंडळाचे पदाधिकारी तालुका समन्वयक अर्जुन तरे, शेलू मंडळाचे अध्यक्ष डॉ रुपेश सोनावळे, हुमगाव मंडळाचे अध्यक्ष दिनेश धुळे, कळंब मंडळाचे अध्यक्ष संतोष बदे, यांच्यासह रोटरी ग्रामीण मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी बार्शी, दिलीप भुंडेरे, बागडे गुरुजी, सुरेश बार्शी, बोरगाव मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते.