सी बर्डच्या विशेष मुलांची कलाकुसर

दिवाळीसाठी बनविल्या सुंदर पणत्या
। चिरनेर । वार्ताहर ।
दिवाळी सणाला थोडेच दिवस राहिले आहेत. दिवाळीत पणत्यांना विशेष महत्व असते. या सणांना लागणार्‍या पणत्या उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानतर्फे चालवित असलेल्या सी.बर्ड विशेष मुलांची शाळा (स्वीकार) उरण नगरपरिषदचे स्वातंत्रसैनिक दिवंगत दत्ता रहाळकर मैदान येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी सुंदर पणत्या बनविल्या आहेत.
या मुलांनी बनविलेल्या पणत्या 20 ते 200 रुपये दोन नग त्याचप्रमाणे 80 ते 200 रुपये या दराने विकल्या जाणार आहेत. शाळेतील विद्यार्थी दर वर्षी राख्या, पणत्या, तोरण, पाकीट, आहेर पाकीट, कागदी पिशव्या आदी वस्तू बनवित असतात. त्या वस्तूंना उरण शहरातील सेंट मेरीज शाळा युईएस शाळा, श्रीमती भागुबाई चांगु विद्यालय, नवदुर्गा नवरात्र मंडळ बोरी तसेच डी.पी.वर्ड कंपनी यांची मागणी असते.

Exit mobile version