शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू

| आगरदांडा | प्रतिनिधी |

शासनाच्या आदेशानुसर आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा बाह्य विद्यार्थी शोधून त्यांच्या पालकांना भेटून शिक्षण किती आवश्यक आहे, याचे महत्व पटवून देऊन शाळा बाह्य विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण सुरू करण्यासाठी नांदगाव हायस्कूल येथील शिक्षक आदिवासी वाडी व अन्य ठिकाणी भेट देऊन या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आदिवासी समाजातील मुले नांदगाव हायस्कूल येथे शिक्षण घेण्यासाठी यावी यासाठी या हायस्कूलचे शिक्षक प्रतिनिधी महेश वाडकर व होम गार्ड सार्थक शेडगे यांनी अदाड येथील मनेर पाडा येथील आदिवासी वाडी येथे भेट देऊन पालकांना संबोधित करून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचे अवहन केले. शाळेत मुले आल्यावर त्यांना पुस्तक वह्या व अन्य तत्सम मदत सुधा करण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ व शिक्षक वृंद अशी मुले शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Exit mobile version