। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील उलवे येथील एक तरुणी हरविल्याची तक्रार उलवे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नेहा सलमान खान असे तीचे नाव असून ती उलवे सेक्टर 24 येथील रहिवासी असून तिचा रंग गोरा, अंगाने मध्यम, उंची 5 फुट 2 इंच, केस काळे, डोळे काळे असून अंगात हिरव्या रंगाचा टॉप व लाईट रंगाची पॅन्ट व पांढरी ओढणी घातलेली आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती मिळाल्याव त्यांनी उलवे पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार कल्पेश पाटील (9209958244) यांच्याशी संपर्क साधावा.