ऑक्सिजन पार्कमध्ये आसन व्यवस्था

| चिरनेर | प्रतिनिधी |

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून, ही आसन व्यवस्था सोनारी येथील कै. नरेश रघुनाथ कडू यांच्या स्मरणार्थ सुमन नरेश कडू यांच्या आर्थिक मदतीतून करण्यात आली आहे.

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये येणार्‍या पर्यटकांना विसावा घेण्यासाठी या आसन व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या ऑक्सिजन पार्कमधील पर्यटकांचा वाढता ओढा पाहता या ठिकाणी आलेला पर्यटक हा निसर्गातील अनेक गोष्टींचा आनंद घेत असतो. यासाठी या आसन व्यवस्थेची निर्मिती केली असल्याचे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कच्या सदस्यांनी सांगितले. यावेळी नागेंद्र म्हात्रे, हरिश्‍चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, सचिन पाटील, विजय म्हात्रे, प्रितेश म्हात्रे, किशोर पाटील, सई, अनुज तसेच पर्यटक म्हणून आलेले संचित गावंड, जीवन पावसकर, मनीष मोकल, प्रणव म्हात्रे, सोनिक ठाकूर, प्रतिश म्हात्रे, विशाल म्हात्रे, नितेश पाटील, संतोष पाटील, हेमा पाटील, प्रितेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

Exit mobile version