बेकायदा टपऱ्यांमधील गुटखासाठा हस्तगत

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल एसटी स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन परिसरातील टपऱ्यांवर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणात गुटखासाठा हस्तगत केला. या कारवाईमुळे बेकायदा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल एसटी स्टॅन्ड परिसर व रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या बेकायदा टपऱ्यांवर महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असलेल्या विविध प्रकारचे गुटखे, पान मसाला, सुगंधित तंबाखू याची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी अन्न सुरक्षा विभागाला करताच अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने या भागात छापे टाकून बेकायदे विक्री करणारे पप्पू प्रजापती (50), प्रीसु गुप्ता (24), शिव पूजन पटेल (22), सुभाष गुप्ता (40), शिवबाकु चौरसिया (37) व सतीश देवाडिगा (41) यांच्या पान टपऱ्यांवर छापे टाकून जवळपास 59,828 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version