। पोलादपूर । प्रतिनिधी ।
स्वदेस फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या स्वप्नातील गांव मोहिमेत पोलादपूर तालुक्यातील पांगळोली गावाची निवड झाली आहे. या गावांचा विकास स्वप्नवत होण्यासाठी स्वदेस, ग्रामस्थ आणि प्रशासनामार्फत प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साठे यांनी दिली.
पांगळोली या गावामध्ये गाव विकास समिती अध्यक्ष अंकुश घोलप, उपाध्यक्ष भगवान शेलार व सचिव श्वेता कदम, माजी पोलीस पाटील रामभाऊ जगताप व सर्व समिती सदस्य व गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, बंधू भगिनी यांनी मेहनत घेऊन उपक्रम यशस्वीपणे राबविले.
उपक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच सविता शेलार, उपसरपंच काशिराम जगताप व सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामसेवक अनिल पवार, अंगणवाडी सेविका पूजा कदम, स्वदेसचे गाव प्रतिनिधी संदेश कदम यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी गावात हरीतक्रांती, वृक्षलागवड, कुक्कुटपालन व्यवसाय, गावातील रस्ते, पाणी पुरवठा, अर्थिक साक्षरता प्रशिक्षण, विविध योजना, शेळी पालन, भाजीपाला लागवड व विक्री, छोटे छोटे उद्योग, करीयर मार्गदर्शन, सेंद्रिय खत व्यवस्थापन असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी झालेल्या या कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे, स्वदेस फाऊडेशनचे प्रदीप साठे, रणजित, अफसाना, प्राजक्ता खेडेकर, संदेश कदम, नागेश, जुलेखा, सुप्रिया आदी स्वयंसेवक व समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. पांगळोती ग्रामसुधार समितीला स्वप्नातील गाव निवडीचे प्रमाणपत्र चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते प्रदान केले.