| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या आधी प्रत्येक फ्रँचायझी पुढील वर्षीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच राजस्थान रॉयल्सने भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला मोठी जबाबदारी सोपवली आहे. द्रविडला राजस्थानने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. द्रविडला अनेक फ्रँचायझींकडून विचारण्यात आले होते. परंतु, त्याने राजस्थानची निवड केली. त्याला बर्याच फ्रँचायझींकडून त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी ब्लँक चेकही ऑफर करण्यात आले होते. मात्र, यानंतरही त्याने राजस्थानबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.