| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड मुख्य बाजारपेठेत प्रतिकिलो 400 रुपये लसूण पार झाल्याने पुन्हा जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे. ऐन गणेशोत्सवात भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडल्याने खिशाला फटका सहन करावा लागत आहे. लसणाची आवक घटल्याने दर वाढल्याचं स्थानिक व्यापार्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच येत्या काळात लसूण आवक आणखी कमी होण्याचा अंदाज ही वर्तविण्यात आल्याने लसणाचे दर 500 रुपये पार करणार, असा अंदाज स्थानिक व्यापारी करीत आहेत. दिवसेंदिवस लसणाचे भाव वाढत असल्याने हे भाव पुन्हा वाढू नये त्याआधीच लसूण खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर प्रतिकिलो 40 रुपयांवरुन 70 रुपये झाला आहे.