। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा गावचे राकेश खराडे यांची ग्रामस्थ मंडळाने मोहोपाडा गावचे पाटील म्हणून दुसर्यांदा बिनविरोध निवड केली आहे. खराडे यांचे गावांसाठी योगदान, कार्यकुशलता,व व्यक्तिमत्त्व पाहून त्यांची मोहोपाडा गावचे पोलिस पाटील म्हणून निवड झाली आहे. मोहोपाडा ग्रामस्थांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थं करणार असून ग्रामस्थांसमोरील समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे पत्रकार राकेश खराडे यांनी सांगितले.